“तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा-”
“ताई, आणखी कोणाला?”
“चल रे दादा चहाटळा !”
“तुज कंठी, मज अंगठी!”
“आणखी गोफा कोणाला?”
“वेड लागले दादाला!”
“मला कुणाचे? ताईला!”
“तुज पगडी, मज चिरडी!”
“आणखी शेला कोणाला?”
“दादा, सांगूं बाबांला?”
“संग तिकडच्या स्वारीला !”
“खुसूं खुसूं, गालिं हसूं-”
“वर अपुले रुसूं”
“चल निघाले, इथे नको बसूं”
“घर तर माझें तुसूं.”
“कशी सुरक्षित, आज अशी”
“गम्मत ताईची खाशी!”
“अता कट्टी फू दादशीं”
“तर मग गट्टी कोणाशीं?”
रूपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
रूपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीत ये ना
प्रीत ये ना, जवळ घे ना…
बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाते उरी प्रिया तुझा
देहावरी फूुल असा शहारा
तुझा, असा शहारा
लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतीत गाती
तू ये निशा करेल पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा