Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीFestival Special Train : पनवेल ते नांदेड दरम्यान सोडणार उत्सव विशेष ट्रेन!

Festival Special Train : पनवेल ते नांदेड दरम्यान सोडणार उत्सव विशेष ट्रेन!

मुंबई : रेल्वे दसरा / दिवाळी / छट पूजा सणांमध्ये (Festival Special Train) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल आणि नांदेड (Panvel To Nanded) दरम्यान २४ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालवणार आहे.

कसं असेल वेळापत्रक?

०७६२६ /०७६२५ पनवेल- नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष (२४ सेवा)

  • ०७६२६ द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष पनवेल येथून दि. २२.१०.२०२४ ते दि. २८.११.२०२४ पर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी १४.३० वाजता सुटेल आणि हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०४.३० वाजता ह पोहोचेल. (१२ सेवा)
  • ०७६२५ द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष हजूर साहिब नांदेड येथून दि. २१.१०.२०२४ ते दि. २७.११.२०२४ पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी २३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा)थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा.

    संरचना : १३ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ जनरेटर कार आणि १ पँट्री कार.

    आरक्षण : ट्रेन क्रमांक ०७६२६ च्या सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १४.१०.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -