Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीSuraj Chavan and Ajit Pawar : स्वप्नपूर्ती... सूरजला 'बिग' घर बांधून द्या;...

Suraj Chavan and Ajit Pawar : स्वप्नपूर्ती… सूरजला ‘बिग’ घर बांधून द्या; अजित पवारांचा एक फोन…

बिग बॉस मराठी ५चा विजेता सुरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. बिगबॉसच्या विजयानंतर बारामतीच्या सूरज चव्हाणची (Suraj Chavan) भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: सूरजला फोन केला होता. पण त्यावेळी सूरजला अजित पवार यांना भेटणं शक्य झालं नाही. पण अखेरीस सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी घेऊन अजित पवारांच्या भेटीला गेलाय. त्याचप्रमाणे अजित पवारांनी यावेळी सूरज चव्हाण घराचीही भेट दिली आहे. गावात नवीन जागा घेऊन त्याला घर बांधून द्या अशी सूचना अजित पवारांनी फोनवरुन दिल्या आहेत. अजित पवारांनी यावेळी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली. तसेच सूरजने अजितदादांना त्याच्या वडिलांच्या जाण्याचा प्रसंग सांगितला. सूरजच्या बहि‍णींविषयीही अजित पवारांनी चौकशी केली होती. तसेच सूरजचा बिग बॉसमध्ये प्रवेश कसा झाला याविषयीही अजित दादांनी चर्चा केली.

अजितदादांकडून सूरजला स्वप्नपूर्ती घर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरजचं घर लहान आहे… त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरात सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे तर बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. पण आता थेटन उपमुख्यमंत्र्यांनीच सूरजला घर गिफ्ट केलं आहे.

रिलमधून पैसे मिळतात का?

बिग बॉसमध्ये सुरज चव्हाणची एंट्री रिलमुले झाली आणि सुरजला त्याच्या रिलमुळेच प्रसिद्धी मिळाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारलं की, बिग बॉस मध्ये कसं बोलवलं? तेव्हा सुरज म्हणाला की, मला रिल बघून बिग बॉसमध्ये बोलावलं. बिग बॉसचा मला कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि गेलो. त्यानंतर पुढे , रिलचे पैसे मिळतात का? त्यावर सूरजने म्हटलं की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत, आता पिक्चर येतोय माझा…

मी जे बोलतो ते करुन दाखवतोच – सूरज चव्हाण

अजित पवारांना सूरजने बिग बॉसच्या घरातील काही किस्सेसुद्धा सांगितले. त्यावेळी सुरजच्या बोलण्यावरुन अजित पवारांना देखील हसू आवरत नव्हतं. सूरजने अजित पवारांना सांगितलं की, दादा ट्रॉफी बारामतीमध्ये आणायची हे मी आधीच ठरवलं होतं. मला बिग बॉसनेही खूप सपोर्ट केला. मी जे बोलतो ते करुन दाखवतोच.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -