‘असे’ असतील पर्यायी मार्ग
मुंबई : विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शिंदे (Shinde Shivsena) यांचा दसरा मेळावा (Dasra Melava) मुंबईच्या आझाद मैदानात पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्याने हा दसरा मेळावा महत्वाचा असणार आहे.
कार्यकर्त्यांकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिंदेसेना दसरा मेळावा दरम्यान होणारी मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गातही मोठे बदल करण्यात आले आहेत.
असे असेल कार्यक्रमाचे नियोजन
शिंदेसेना दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर वीस बाय साठ चा भव्य मुख्य स्टेज बनवण्यात आला आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या असून पंचवीस हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था आझाद मैदानात करण्यात आली आहे. तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी देखील स्टेजवर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आझाद मैदान परिसरामध्ये खाण्यापिण्यासाठी आणि शौचालयासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचबरोबर राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची वाहनं बेलार्ड पिअर, काला घोडा, मुंबई युनिव्हर्सिटी परिसर, चर्चगेट परिसर आणि सीएसएमटी स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
काय आहेत पर्यायी मार्ग?
- छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन येथील वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) डि. एन रोड – एल. टी. मार्ग – वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) अशी वळवण्यात आली आहे.
- वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (सि.एस. एम. टी जंक्शन ) येथील वाहतूक वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) एल. टी. मार्ग चकाला जंक्शन – उजवे वळण – डी. एन. रोडने सी.एस.एम.टी. अशी वळवण्यात येईल.
- चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) येथील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ.सी. एस. जंक्शन) उजवे वळण – हुतात्मा चौक – उजवे वळण – रामदेव पोद्दार चौक (सि.टी.आ. जंक्शन)- अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) उजवे वळण – एम. के. रोड – आनंदीलाल पोद्दार -उजवे वळण वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) मार्ग पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
- वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते हुतात्मा चौक मार्गावरील वाहतूक वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्श न) – आनंदीलाल पोतदारमार्ग – डावे वळण महर्षि कर्वे रोड – अहिल्याबाई होळकर चौक – डावे वळण – रामदेव पोतदार चौक – वीर नरीमन रोडने पुढे हुतात्मा चौक मार्गे पुढे जाता येईल.
- चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) येथील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) उजवे वळण हुतात्मा चौक काळा घोडा जंक्शन – रिगल जंक्शन – डावे वळण – एस.बी.एस. रोडने पुढे इच्छित स्थळी जाता येईल.