Raj Thackeray Podcast : हीच वचपा काढण्याची वेळ, तुम्ही बेसावध राहून चालणार नाही; राज ठाकरेंच जनतेला आवाहन

  86

मुंबई : दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंचा पॉडकास्ट आज सकाळी प्रसारित करण्यात आला. आगामी निवडणुकीत बेसावध राहू नका. ही क्रांतीची वेळ आहे. शमीच्या झाडावरील शस्त्र आता उतरवा. वचपा घेण्याची ही वेळ आहे. तुम्हाला या सगळ्यांचा वेध घ्यावा लागेल, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पॉडकास्टद्वारे जनतेला केलं आहे. पॉडकास्टमधून राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.


राज ठाकरे म्हणाले की, आज दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा म्हटलं की, आपण सोनं लुटणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपण दरवर्षी करतो. महाराष्ट्राच सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपट्याची पानं सोडून आपल्याजवळ दुसरे काही राहत नाही. मात्र आमचं दुर्लक्ष. आम्ही आमच्या स्वतःच्या आयुष्यात मजगुल तर कमी कधी आम्ही जातिपाठीत मजगुल आहोत. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? आजचा दसरा हा फार महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून अजिबात चालणार नाही.



महाराष्ट्राची या सगळ्यात प्रगती कुठे चालली आहे?


दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि हे राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. महाराष्ट्राची या सगळ्यात प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नाही. आमच्या हातात मोबाईल आले कलर टीव्ही आले, तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती समाजाची व्हावी लागते. अजूनही आपण चाचपडतच आहोत. पण, तुम्हाला इतक्या वर्षांच्या प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच लोकांना दरवेळी निवडून देतात आणि नंतर पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहायचा आणि नंतर पाच वर्षा बोंब मारायची.




तुम्ही मतदारांनी या निवडणुकीत क्रांती केली पाहिजे.


आपण म्हणतो ना की, पांडवांनी शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती. तसेच तुम्ही ऐन मोक्याच्या वेळेला तुमचं शस्त्र झाडावर नेऊन ठेवतात. जे मतदानाचे शस्त्र तुमच्या हातात आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता या लोकांना शिक्षा न करता तुम्ही ती नुसती शस्त्र वरती ठेवून देतात. निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढतात आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहतात. पण, मतदानाच्या दिवशी काय होते? हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या ओळखीचा आहे असे करून आपले राज्य उभे राहत नाही. आज तुम्हाला संधी समोरून आली आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिली. मी उद्या आपला मेळाव्यातून सविस्तर बोलेलंच. तुम्ही मतदारांनी या निवडणुकीत क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जे करत आहात या लोकांना तुम्ही जोपासले, सांभाळले ते तुमच्या मतांशी प्रतारणा करण्यासाठी आले. तुम्हाला अत्यंत गृहीत धरले गेलं. गृहीत धरणे हेच दरवेळी महाराष्ट्राचे नुकसान करत आले.




हीच वचपा घेण्याची वेळ


महाराष्ट्रातले तरुण-तरुणी, शेतकरी, सर्वसामान्य व्यक्तींना माझी अत्यंत हात जोडून विनंती आहे की, येणाऱ्या निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरील शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. तुम्हाला या सगळ्यांचा वेध घ्यावा लागेल. गेली अनेक वर्ष आणि खासकरून गेली पाच वर्ष तुमच्या मतांची ज्यांनी प्रतारणा केली ज्यांनी तुम्हाला गृहीत धरला. वेड्यावाकड्या युती आणि आघाड्या करत बसले. आज बोलतील सगळेजण एकमेकांचे उणीधुणी काढतील. पण, त्याच्यात तुम्ही कुठे असणार? तुम्ही यात नसणार आहात. मी महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षापासून स्वप्न पाहत आहेत. हे स्वप्न साकारण्याची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळू द्या. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र बनवणे हेच माझं स्वप्न आहे. आत्ताच शमीच्या झाडावरून ते सगळे शस्त्र उतरवा आणि ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या, असे आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crime news : मुंबईच्या काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ६ अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरातून हादरा बसणारी घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर

मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने केला घात, महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमुळे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचा मृत्यू

मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९

Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले