देवीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड
पुणे : आज नवरात्रोत्सवमधील दहावा दिवस म्हणजे विजयादशमीनिमित्त (Dussehra) पुणे शहरातील सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या (Pune Mahalakshmi Devi) मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी (16 Kg Gold Saree) परिधान करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली असून देवीचे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता महालक्ष्मी मंदिरात भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी जमली आहे.
देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. देवीला परिधान केलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केलेली आहे. २१ वर्षांपूर्वी देवीच्या मुर्तीसाठी ही सोन्याची साडी तयार करण्यात आली होती. अनेक कारागिरांनी जवळपास सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम केले होते. त्यानंतर ही साडी पूर्ण झाली आहे.
काय आहे साडीचे वैशिष्टयं?
महालक्ष्मी देवीसाठी एका भक्ताने २१ वर्षांपूर्वी ही साडी अर्पण केली. ही साडी १७ किलोची असून अनेक कारागिरांनी जवळपास सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम केले होते. साडीवर आकर्षक प्रकारचे नक्षीकाम करण्यात आले आहे. तसेच वर्षभरातून दोन वेळेस म्हणजे दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवली जाते.