नाशिक : श्रीराम प्रभूंचे शिल्प प्रत्येकाला धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास इस्कॉन संस्थेचे वैश्विक समिती सदस्य गौरांग प्रभुजी यांनी व्यक्त केला. तपोवनाची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून रामसृष्टी उद्यानात भव्य आकर्षक असे राज्यातील सर्वात मोठे प्रभू श्रीराम यांच्या ७० फूट उंचीच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला.
परमपूज्य इस्कान मंदिराचे गौरांग प्रभू, ज्येष्ठ अर्थ तज्ञ विनायक गोविलकर, महंत रामकिशोर शास्त्री, महंत रामस्नेहीदास महाराज, श्रीमहंत सुधीरदास महाराज पुजारी, महंत बालकदास महाराज, स्वामी श्रवनगिरी महाराज, अरूण गिरि महाराज, महंत भक्ती चरणदास महाराज, प्रजापिता ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी, पूनम दिदी, गोविंद दास महाराज, प्रवीणदास महाराज, संतोषदास उदासीन महाराज आदी उपस्थित होते.
अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर म्हणाले की, श्रीराम शिल्प हे अतिशय सुंदर अशी कल्पना साकार झालेली दिसते. आ. राहुल ढिकले यांनीयांनी प्रभू श्रीराम शिल्प मनात कल्पना येत नाही ती प्रत्यक्षात साकारली आहे.प्रभू श्रीराम म्हणजे गुणाचे द्योतक आहे. आ. ढिकले हे धर्म रक्षणाचे काम पुढील काळात देखील करीत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
श्री दिगंबर आखाडाचे महंत रामकिशोरदास महाराज म्हणाले की, भाजपा हा एकच पक्ष हिंदुत्ववादी आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड राहुल ढिकले यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे.
आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज यांनी राहुल ढिकले यांचे पिताश्री उत्तमरावजी ढिकले यांनी खासदार असताना सर्वात प्रथम पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारकडून दीडशे कोटी रुपये नाशिक कुंभमेळ्या करिता आणल्याचे सांगितले. रामभक्त असलेल्या ढिकले कुटुंबीयांचा कोणत्याही निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत पराभव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वात प्रथम ते श्री काळारामाच्या चरणी येऊन तेथून मग निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरता जातात. तोच कित्ता राहुल ढिकले यांनी गिरवलाय. पुढच्या टर्मला देखील ते आमदार होऊन महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री व्हावे असा आशीर्वाद श्रीमहंत सुधीरदास महाराजांनी दिला.