Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

Nilesh Rane : निलेश राणे यांच्याकडून कांदळगाव शाळा बांधण्यासाठी २४ लाखांचा निधी मंजूर!

Nilesh Rane : निलेश राणे यांच्याकडून कांदळगाव शाळा बांधण्यासाठी २४ लाखांचा निधी मंजूर!

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव शाळा (School Renovate) इमारत जीर्ण झाली होती. अशातच झालेल्या अतिवृष्टीमुळे या शाळेचे छप्पर कोसळून मोठी हानी झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र या प्रकरणावर लक्ष देऊन स्वखर्चाने शाळा दुरुस्त करुन लवकरच सुसज्ज इमारत उभारणार असल्याचा शब्द दिला होता. माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिलेला शब्द खरा करत शाळा बांधकामासाठी २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

याबद्दल कांदळगाव ग्रामस्थ यांनी खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच या शाळेचे बांधकाम लवकरच सुरू होईल, अशी माहिती कांदळगाव समिपंचायत सदस्य विहार कोदे यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >