Saturday, October 25, 2025
Happy Diwali

CM Eknath Shinde : ठामपा कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

CM Eknath Shinde : ठामपा कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा!
ठाणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद योग कुटिर येथे केली. याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेने सन २०२२-२३साठी २१ हजार ५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात २ हजार ५०० रूपयांची वाढ करून २४ हजार देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
Comments
Add Comment