‘निहॉन हिदानक्यो’ला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

  117

नवी दिल्ली : जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांचा काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे, यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेने मोठे काम केले आहे. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.


या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मायक्रोरेना आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे, असे नोबेल कमिटीने म्हटले आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर

३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही म्हणून हिंदू महिलेवर बलात्कार आणि मारहाण, आरोपीला अटक

ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणते प्रयोग करणार ?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर