Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीNaad The Hard Love : 'नाद' चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Naad The Hard Love : ‘नाद’ चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : मराठी चित्रपटांची (Marathi Cinema) परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा ‘नाद – द हार्ड लव्ह’ (Naad The Hard Love) हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज (Teaser Release) झालेल्या अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलरने (Trailer) खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत (Marathi Industry) बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या ट्रेलरवर राज्यभरातून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटाच्या टॅगलाईनसारखाच ट्रेलरही ‘हार्ड’ असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांनी ‘नाद’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. ‘नाद’ची व्याख्या सांगत टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अ‍ॅक्शनचा धमाका असलेला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटाचे स्वरुप काय?

‘नाद – द हार्ड लव्ह’ हा चित्रपट शीर्षकाप्रमाणेच एक हार्ड लव्हस्टोरी सांगणारा आहे. प्रसंगानुरूप असलेले दमदार आणि रोमँटिक संवाद ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही आजवर पाहायला मिळाले नसतील अशी लाल मातीतील अ‍ॅक्शन दृश्ये नजर खिळवून ठेवतात. गाण्यांची झलक ट्रेलरमध्ये आहेच, पण रोमँटिक दृश्येही लक्ष वेधतात. प्रेम म्हणजे नेमकं काय? हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही. आजतागायत बऱ्याच दिग्दर्शकांनी प्रेमाचे विविध पैलू रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात हार्ड लव्ह म्हणजेच खरंखुरं प्रेम काय असतं ते पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत कधीही न उलगडलेल्या प्रेमाच्या पैलूंसोबतच प्रेमाच्या गुलाबी रंगांमधीलही विविधांगी छटा यात बघायला मिळतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -