मुंबई : क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) धक्कादायक निर्णय घेतला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पात्र होण्यासाठी २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही महत्तवाची मालिका असून यामध्ये भारतीय संघ एकूण पाच कसोटी सामने खेळणार आहे. परंतु बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील काही सामन्यांमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे.
रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी खेळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रोहित शर्माने अधिकृपणे कोणतीही घोषणा केली नाही. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा तपशील दिला आहे.
दरम्याम, संघ व्यवस्थापनासमोर रोहितच्या जागी भारताचा कर्णधार कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.