Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीSantosh Juvekar : संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Santosh Juvekar : संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : सध्या प्रत्येक सिनेसृष्टीत चित्रपटांचा (Movie Release) धडाका उडत आहे. मराठी, हिंदी, तमिळ-तेलुगु अशा अनेक भाषांमध्ये एकामागोमाग एक चित्रपट रिलीज होण्याची रांग लागत आहे. अशातच मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खरं तर सिनेमांतल्या भूमिकांसाठी कलाकार अतोनात कष्ट करतात. एखादं दृश्य खरं वाटावं तेच साकारलेल्या भूमिकेत संपूर्णत: रमून जाण्यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो. आगामी ‘रानटी’ चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेत तसेच पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Raanti) हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअप मध्ये धावण्यापासून ते अगदी अॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषने साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्विकारत संतोषनी घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.

भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगितले की, ‘कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते, दिग्दर्शक समित कक्कड कडून मला नेहमी माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह व्दिगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.

दरम्यान, ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -