Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीReading Inspiration Day : राज्यभरात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार वाचन प्रेरणा...

Reading Inspiration Day : राज्यभरात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन!

राबविले जाणार विविध उपक्रम

मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ (Reading Inspiration Day) म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/ मंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय ग्रंथावर साहित्य चर्चाʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे  डॉ.सदानंद मोरे असून या कार्यक्रमात  डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ.अशोक चौसाळकर यांचा सहभाग असणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता न्यू मिनी थिएटर (करिश्मा थिएटर), पाचवा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसर, सयानी मार्ग, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सर्वांकरता खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत प्रसारमाध्यमांनी उचित दखल घेऊन त्यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -