Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

Raj Thackeray : दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

शिंदेंची तोफ आणि राजवाणी समोर मशाल पेटणार का ?

मुंबई: यंदाही दरवर्षीप्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात, ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. मेळाव्याची दोन्ही गटाकडून जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. आता मात्र राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे.

दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद आहेत. पॉडकास्टच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहेत. त्यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत ‘राज’ वाणीचा आवाजही आता घुमणार, असून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या समोर उबाठाची मशाल पेटणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आजच्या वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजला जाहिराती-

राज ठाकरेंच्या आजच्या अनेक वृत्तपत्रात पहिल्याच पानावर जाहीरात आहेत. यामध्ये माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारुया…मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा…असं राज ठाकरेंच्या जाहीरातीमध्ये म्हटलंय.

विधानसभा निवडणुकांचं राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं असून मनसेचे ७ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, पंढपूरमधून दिलीप धोत्रे, चंद्रपूरमधून मनदीप रोडे, हिंगोलीतून बंडू कुटे, राजुता येथून सचिन भोयर, आमि वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांना मनसेकडून आगामी विधानसभेसाठी तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे उद्या होणाऱ्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे ७ उमेदवार

१. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
२. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
३. दिलीप धोत्रे – पंढरपूर
४. चंद्रपूर – मनदीप रोडे
५. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
६. राजुरा – सचिन भोयर
७. वणी – राजू उंबरकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -