पुणे : यंदाच्या नवरात्रोत्सवात व दसऱ्याला झेंडूच्या फुलांची (Marigold flowers) मार्केटयार्ड बाजारात आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडू फुलांच्या दरात मोठी वाढ (Flowers Price Hike) झाली आहे. अशातच नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना फुलांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
सध्या बाजारात झेंडू ८० ते १०० रुपये प्रतिकिलो भाव झाला आहे. तसेच फुलांच्या हारांची किमतीत देखील वाढ झाली. या वाढलेल्या दराचा फायदा फूलविक्रेत्यांना होत असला तरी परतीच्या पावसाने फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.