‘या’ तारखेआधीच करा अर्ज
मुंबई : महिलांना आर्थिक दृषट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेद्वारे पात्र अर्जदार महिलांना १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना तीन हप्ते दिले आहेत. तसेच काहींना चौथा आणि पाचव्या महिन्याचा हप्ता आधीच मिळाला आहे. परंतु आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज न भरलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. महिला आता १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करु शकणार आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, मुदतवाढसह सरकारने योजनेत मोठा बदल केला आहे. त्यानुसार महिला आता अर्ज ऑनलाईन पद्धतीने न भरता केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.