Mission Maharashtra : भाजपाचे आता ‘मिशन महाराष्ट्र’

खास प्लॅनमध्ये ‘या’ ३० जागांवर देणार विशेष लक्ष


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देणार रणनीतीला अंतिम रुप


नवी दिल्ली : हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उभे केलेले मोठे आव्हान मोडून काढत विजय मिळवल्यानंतर भाजपाने (BJP Mission) आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष (Mission Maharashtra) केंद्रीत केले आहे. हरयाणामध्ये विजय निश्चित मानणाऱ्या काँग्रेसला निकालांमधून जबर धक्का बसला होता. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत भाजपाने खास रणनीती आखली आहे. या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. या रणनीतीअंतर्गत पुणे, मुंबई व विदर्भावर खास लक्ष देण्यात येत आहे.


पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार आहे. येथे अधिक बलाढ्य उमेदवार उतरवण्याची अमित शहा यांची योजना आहे. त्यात मुंबईमधील ६, पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांची समावेश आहे. मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचा वरचष्मा असलेल्या ६ जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोघांकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे.


बंडखोरांची समजूत काढण्यासाठी खास रणनीती


हरयाणामधील निकालांनंतर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फिडबॅक घेण्यात येत आहे. महायुतीमधून या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठा समाज व ओबीसींमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी, बंडखोर उमेदवारांची समजूत घालण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे.


नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे रवाना


महायुतीच्या जागावाटपामध्ये ओबीसी आणि मराठा समाजादरम्यान ताळमेळ बसवला जाईल. दोन्ही समाजातील लोकांना समान प्रमाणात तिकीटे दिली जातील. तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्याला जवळपास अंतिम रूप दिले गेले आहे. स्वत: अमित शहा हे याबाबतच्या रणनीतीला अंतिम रूप देत आहेत. एवढेच नाही तर ओबीसींसाठीची नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्तावर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

US Secretary meets PM Modi : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रुबियो यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने व्हाईट हाऊसला भेट देण्याचे निमंत्रण नवी दिल्ली :

Indian Army Cheetah Helicopter : भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले, ३ अधिकारी किरकोळ जखमी

- अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू लडाख : लडाखच्या दुर्गम आणि उच्च पर्वतीय भागात भारतीय लष्कराच्या

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक घाव! एक्स-इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या

Karnataka Road Accident : कर्नाटक हादरलं! कलबुर्गीत मृत्यूचा कहर; भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जण ठार

कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवार २२ मे रोजी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला.

Agni-1 Missile : ओडिशात करण्यात आली अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताचा शत्रुराष्ट्रांना स्पष्ट इशारा

ओडिशा : भारताने आपल्या सामरिक क्षमतेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणी

Supreme Court : आई वडील IAS असल्यास मुलांना OBC आरक्षणाचा लाभ का ? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरची मर्यादा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी सुरू होती. या