Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीRatan Tata Death : आजचा दिवस हा भारतासाठी आणि भारतीय उद्योग जगतासाठी...

Ratan Tata Death : आजचा दिवस हा भारतासाठी आणि भारतीय उद्योग जगतासाठी फार दु:खद दिवस आहे!

रतन टाटा यांच्या निधनानंतर उद्योजकांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे काल दु:खद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. या धक्कादायक घटनेमुळे जगभरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान रतन टाटा यांच्या निधनाचं बातमी मिळताच अनेक उद्योगपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मी एक चांगला मित्र गमावला

“वैयक्तिक स्तरावर रतन टाटा यांचं निधन ही माझ्यासाठी फार खेदजनक गोष्ट असून मी एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा मी संवाद साधला तेव्हा मला प्रेरणा मिळाली. त्यांच्यासोबतच्या प्रत्येक संवादामधून ऊर्जा तर मिळालीच पण त्यामधून त्यांच्या व्यक्तीमत्वातील गुणवैशिष्ट्ये आणि स्वभावाची छाप ते पाडायचे,” असं मुकेश अंबांनींनी म्हटलं आहे. “रतन टाटा हे दूरदृष्टी असणारे उद्योजक आणि समाजसेवक होते. त्यांनी कायमच समाजाच्या उद्धारासाठी काम केलं,” असंही मुकेश अंबानींनी म्हटलं आहे.

भारताला अधिक उत्तम बनवण्यासाठी ते फार धडपडायचे

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माझी रतन टाटांबरोबरची शेवटची भेट ही गुगलमध्ये झाली होती. आम्ही वेमोच्या प्रगतीबद्दल बोललो होतो. त्यांच्याकडून या विषयावर ऐकणं फारच प्रेरणादायी होतं. त्यांनी आपल्या मागे फारच असमान्य उद्योग व्यवसाय आणि सामजसेवेचा वास सोडला आहे. ते भारतील उद्योगजगतामध्ये आधुनिक नेतृत्व तयार व्हावं यासाठी सक्रीय होते. भारताला अधिक उत्तम बनवण्यासाठी ते फार धडपडायचे. रतन टाटांच्या आत्म्यास शांती मिळो,” असं पिचाई यांनी म्हटलं आहे.

घड्याळाची टिकटीक थांबली आहे कारण…

उद्योजक हर्ष गोयंका यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांना आदरांजली वाहिली आहे. “घड्याळाची टिकटीक थांबली आहे कारण टायटन शक्तीशाली व्यक्ती आपल्याला सोडून गेलाय. रतन टाटा हे प्रामाणिकपणा, योग्य नेतृत्व आणि दातृत्वाची मशाल असल्याप्रमाणे होते. त्यांनी त्यांच्या कामगिरीने उद्योगजगतावर कायमचा ठसा उमटवला. त्यांनी इतर क्षेत्रांमध्येही आपल्या कामाची छाप सोडली. ते कायमच आमच्या आठवणींमध्ये राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,” असं हर्ष गोयंका यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -