Saturday, November 9, 2024
HomeदेशRatan Tata Death : मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन! शांतनू पुढे, रतन...

Ratan Tata Death : मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचेच डोळे भरले

मैत्री कोणतीही असूदेत मात्र मैत्रीला वयाचं बंधन नसतं, त्यामुळे वयात कितीही अंतर असलं तरीसुद्धा सूर जुळल्यावर तुमची छान मैत्री होऊ शकते. याचच उदाहरण म्हणजे, रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची एक घट्ट मैत्री. रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची मैत्री खूपच खास होती. वयामध्ये ५५ वर्षांचं अंतर असताना रतन टाटा आणि शांतनूमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. टाटांच्या निधनानंतर टाटा समूहातील कामगार आणि रतन टाटा यांचा तरुण जिवलग मित्र शांतनू नायडू याने त्याच्या जवळचा मित्र गमावला. दरम्यान, रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतनू बाईकद्वारे हळूहळू पुढे जात रस्ता मोकळा करत होता. शांतनूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून सर्वच भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय.

कुलाबामधील त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील एनसीपीए येथे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रतन टाटा यांचं पार्थिव एका गाडीमधून अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. यादरम्यान रतन टाटा यांचा ३१ वर्षीय जिवलग मित्र आणि स्वीय सहाय्यक शांतनू नायडू देखील होता. यावेळी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतून बाईक चालवत हळूहळू पुढे जात रस्ता मोकळा करताना दिसला.

दरम्यान, रतन टाटांच्या निधनानंतर शांतनू नायडू यानं एक खास पोस्ट लिहिली आहे. “मला रतन टाटांसोबतच्या मैत्रीने खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. अलविदा माझ्या लाईटहाऊसला…,” अशी पोस्ट शांतनूने लिहिली आहे.

Who is shantanu naidu : शांतनू नायडू आहे तरी कोण?

रतन टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक म्हणजे शांतनू नायडू. त्यांचा मित्र व सहाय्यक म्हणून तो ओळखला जातो. रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्यातील मैत्रीचा समान धागा म्हणजे दोघांचेही समाजावर असलेले प्रेम. २०१४ साली दोघांची पहिली ओळख झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. रतन टाटांच्या शेवटच्या काही दिवसांत शांतनूच त्यांच्यासोबत होता. शांतनू नायडू हा टाटा ऑफिसमध्ये जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतो. तसंच, टाटा ग्रुपला नव्या स्टार्टअप्ससाठी व गुंतवणुकीसाठी सल्ले देतो. इतकंच नव्हे तर शांतनूची स्वतःची एक संस्था आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -