मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) तीन महिन्यांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) सुरु करभ्याचा निर्णय घेतला होता. त्या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असताना विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ‘लाडकी बहीण योजने’बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे, तर महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्या विधानावर भाजपा पक्षाने आक्षेप घेतला असून भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधात मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल केला आहे.