Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाSachin Tendulkar : क्रिकेटचा देव मैदानात उतरणार! २४ वर्षांनंतर होणार टीम इंडियाचा...

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मैदानात उतरणार! २४ वर्षांनंतर होणार टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) २४ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणार (Captain) आहे. सचिनला इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये (International Masters League) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह उसळला आहे. या विशेष लीगची सुरुवात १७ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये (DY Patil Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.

२००० साली सचिनने शेवटचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कर्णधारपद सौरव गांगुलीकडे सोपवल्यानंतर, आता तब्बल दोन दशकांनंतर सचिन पुन्हा भारतीय टीमचं नेतृत्त्व करणार आहे. त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी ही मोठी संधी आहे कारण सचिनला पुन्हा एकदा मैदानावर नेतृत्व करताना पाहण्याचा आनंद मिळणार आहे. लीगमध्ये भारतासह प्रमुख देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व कुमार संगकारा करणार असून, ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेकडून जॅक कॅलिस, इंग्लंडकडून इयॉन मॉर्गन आणि वेस्ट इंडिजकडून ब्रायन लारा कर्णधारपद सांभाळणार आहेत. भारतात होणाऱ्या या लीगमध्ये अनुभवसंपन्न खेळाडू पुन्हा एकदा आपल्या कौशल्यांचा जलवा दाखवणार आहेत. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ही क्रिकेटप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. त्यात विश्वचषक विजेते, महान फलंदाज आणि अनुभवी कर्णधार पुन्हा एकदा एकत्र येऊन आपलं कौशल्य दाखवणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -