Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Accident News : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बसची कंटेनरला जोरदार धडक

Accident News : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बसची कंटेनरला जोरदार धडक

१६ प्रवासी गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर : राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसची समोर असणाऱ्या कंटेनरला जोददार धडक बसली. या धडकेत १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,आज पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात ही घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव खासगी बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत १६ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.


दरम्यान, जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. विकासाचा महामार्ग म्हणून ओळख निर्माण केलेल्या या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्ग पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment