नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नुतीच न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेसाठी टॉम लॅथमला कर्णधारपद देण्यात आले आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर तो प्रथमच संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड संघ शुक्रवार, ११ फेब्रुवारी रोजी भारतीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सध्या संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. संघाला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला.
मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या संघात मार्क चॅपमनला संधी देण्यात आली आहे. तर इश सोधीने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार केन विल्यमसनला दुखापत असूनही संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल्यम ओ’रुर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स , इश सोधी (दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साउथी, केन विल्यमसन आणि विल यंग.