हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या दिवसात कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये ९ दिवस चालणाऱ्या अष्टमी आणि नवमीला कन्या पूजनाचे आयोजन केले जाते. नवरात्रीत उपवासाच्या आठव्या दिवसाला महाअष्टमी आणि नवव्या दिवसाला महानवमी असे म्हणतात. देवीचे भक्त या दिवशी कन्या पूजन करतात. कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींना घरातील काळे हरभरे आणि हलव्याचा प्रसाद खायला दिला जातो. देवीच्या रूपात ९ मुलींना भेटवस्तू, भोजन देऊन त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते. वास्तविक, मुलींना देवीचं रूप म्हटले जाते म्हणून पूजा आणि भोजनानंतर त्यांना विशेष भेटवस्तूही दिल्या जातात. (Navratri kanya puja gift ) पण, भेटवस्तूंचा जिथे प्रश्न येतो तेव्हा मुलींना भेटवस्तू म्हणून काय द्यायचे याबद्दलचा प्रश्न महिलांच्या मनात येतो. कन्या पूजनामध्ये मुलींना भेटवस्तू देण्यासाठी अशा विविध गोष्टी आहेत.ज्या पाहिल्यानंतर सगळ्याच मुली आनंदी होतील. परंतु भेटवस्तू देताना त्यांच्या गरजा आणि आवडी-निवडी या दोन्हींची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हीसुद्धा या वेळी नवरात्रीत कन्या पूजन करणार असाल तर काही भेटवस्तूंच्या संकल्पना शेअर करणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच सोप्या पडतील.
१. लाल वस्त्र आणि बांगड्या
नवरात्रीमध्ये कन्या पूजनाच्या दिवशी मुलींना लाल कपडे आणि बांगड्या भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे. लाल रंग हा वृद्धिचे प्रतीक मानला जातो. लाल रंगाचे कपडे भेटवस्तू म्हणून दिल्याने मुलींचे शुभत्व वाढते. लाल कपड्यांमध्ये तुम्ही लाल रंगाची ओढणी, किंवा पोलका ड्रेस तुम्ही मुलींना गिफ्ट करू शकता. तुम्ही लाल रंगामध्ये सगळ्याच मुलींना सेम ड्रेससुद्धा देऊ शकता.
२. फळे
नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करताना मुलीच्या प्रसादासोबत एक फळ असावं. असे मानले जाते की, मुलींना नवरात्रीमध्ये फळे दिल्याने तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटीने परत मिळते. फळांमध्ये तुम्ही केळी, सफरचंद आणि नारळ देऊ शकता. या ३ फळांचे दान केल्याने तुमच्या घरातील सुख-समृद्धी वाढते.
३. स्टेशनरी
लहान मुलींना स्टेशनरी उपयोगी येते. त्यामुळे तुम्ही स्टेशनरी वस्तू भेट देऊ शकता. रोजच्या कामांसाठी या वस्तू मुली वापरू शकतात. त्यांना एक पेंटिंग बुक, नोटबुक, पेन, पेन्सिल बॉक्स,आणि पेन्सिलचा संच इ. मुलींच्या वयानुसार तुम्ही त्यांना स्टेशनरीप्रमाणे भेट द्यावी.
४. हेअर एक्सेसरीज
लहान मुलांना हेअर एक्सेसरीज दिल्या कि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. लहान मुलींच्या केसांमध्ये रंगीबेरंगी हेअर एक्सेसरीज खूप सुंदर दिसतात. अशा परिस्थितीत केसांच्या क्लिप, रंगीबेरंगी केसांचे हेअर बँड, बीड्स इत्यादी गोष्टींचा एक छोटा कॉम्बो पॅक बनवून कन्या पूजेच्या वेळी तुमच्या घरी येणाऱ्या मुलींना भेट म्हणून देऊ शकता.
५. दागिने
लहान मुलींना कपड्यांपेक्षा दागिने जास्त आवडतात. मुलींना नटायला लहानपणापासूनच आवडतं. म्हणून त्यांना अशा भेटवस्तू पाहून आनंद होईल. हेअरबॅण्ड, हार, कानातले, बांगड्या, टिकल्यांची पाकीटं, छोटे नेकलेस अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मुलींना भेट म्हणून देऊ शकता.
इतकंच नाही तर जाताना त्यांना दक्षिणा म्हणून पैसेही दिले जातात. आपण इच्छित असल्यास, आपण त्यांना भेट म्हणून नाणी किंवा पैसे देऊ शकता. लहान मुली भेटवस्तू पाहून खूप आनंदी होतात त्यामुळे त्यांना तुमची ही भेट खूप आवडेल.