मुलतान : इंग्लिश फलंदाज जो रूट हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५ हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत त्याने शतक झळकाले. मुलतान कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शतक झळकावल्यानंतर जो रूट टॉप-५ कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने कसोटीत १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. जो रूट आता इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा कसोटी फलंदाज बनला आहे. मुलतान कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५ हजार धावा करणारा जो रूट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ५९ सामन्यांच्या १०७ डावांमध्ये ५ हजार धावांचा आकडा पार केला. त्याने या स्पर्धेत १६ शतके आणि २१ अर्धशतके केली आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील अव्वल फलंदाजांच्या यादीत रूट पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्याच देशाचा माजी सलामीवीर ॲलिस्टर कूकला १२४७२ धावा करून मागे सोडले.
- सचिन तेंडुलकर – १५९२१ धावा पहिला
- रिकी पाँटिंग १३३७८ धावा) दुसरा
- जॅक कॅलिस १३२८९ धावा तिसरा
- राहुल द्रविड १३२८८ धावा चौथा