मुंबई : प्रत्येकाचं सर्वसामान्य माणसाचं स्वत:च हक्काचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडासह (Mhada) सिडकोकडून (Cidco) नघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशातच काल म्हाडाकडून मुंबईत २०३० घरांसाठी सोडत झाली. १ लाख १३ हजार ५४२ पैकी २०१७ अर्जदारांना हक्काची घरं मिळाली. मात्र ज्या लोकांना यावेळी सोडतीमध्ये घरं मिळाली नाहीत त्यांना दिलासा देणारी बातमी (Mhada Lottery)समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांकडून मिळणार भरघोस प्रतिसाद पाहता म्हाडा पुन्हा घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ साली एप्रिल- मे महिन्यात म्हाडाच्या वतीनं आणखी एक सोडत जारी करण्यात येणार आहे. यामध्ये साधारणत: २ ते ३ हजार घरांचा समावेश असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी दिली.
दरम्यान, आगामी सोडतीसाठी घरे कोणत्या भागांमध्ये असतील हे स्पष्ट नसल्यामुळे गर घेणाऱ्या इच्छुकांना या सोडतीची उत्सुकता लागली आहे.