Garba Pass Scam : मुंबईत गरब्याचे बनावट पासेस

  81

मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांच्या ‘गरबा पास स्कॅम’चा पर्दाफाश


मुंबई : देशभरात नवरात्री उत्सवाची धूम सुरू असून विविध ठिकाणी गरबा-दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवात बाहेरील लोकांपासून सुरक्षा राखण्यासाठी प्रवेश तिकीट किंवा पासेसद्वारे दिला जातो. मात्र, मुंबईतील काही कॉलेज विद्यार्थ्यांनी याचाच गैरफायदा घेत ‘गरबा पास स्कॅम’ (Garba Pass Scam) रचल्याचे समोर आले आहे.


मुंबईच्या बोरिवली परिसरात रायगड प्रतिष्ठान आयोजित 'रंग रास गरबा' कार्यक्रमासाठी ६०० बनावट सीझन पास तयार करून विकण्याच्या आरोपात सहा विद्यार्थ्यांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी, वय १८ ते २० वर्षे आहे. हे सर्वजण कॉलेज विद्यार्थी असून त्यात मनोज वेशी चावडा (१९), अंश हितेश नागर (२०), भव्य जितेंद्र मकवाना (१९), राज शैलेश मकवाना (१९), यश राजू मेहता (१९) आणि केयूर जगदीश नाई (२०) यांचा समावेश आहे.


या टोळीने नवरात्री काळात कमी दिवसांत मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने ६०० बनावट गरबा पास तयार केले. त्यांची एकूण किंमत अंदाजे ६ लाख रुपये होती.


मुंबईत कॉलेज विद्यार्थ्यांनी केलेल्या 'गरबा पास' स्कॅममधून, ६०० बनावट पासेस विकून लाखोंची कमाई करणार होते. मात्र सोमवारी (७ ऑक्टोबर) संध्याकाळी, दोन तरुणांनी हे पास वापरून गरबामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी चेकिंग दरम्यान पासवरील बारकोड स्कॅन न झाल्याने सुरक्षारक्षकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.


पोलिसांनी चौकशीदरम्यान या टोळीचा भांडाफोड केला व बनावट पास बनवण्याचे साहित्य जप्त केले. आरोपींनी आणखी किती पासेस तयार केले आहेत, किती जणांना विकले आहेत आणि या स्कॅममध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी