पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७,६४५ कोटींहून अधिक विविध प्रकल्पांच्या कामांचे भूमीपूजन व उद्घाटन
नवी दिल्ली : आज महाराष्ट्राला १० मेडिकल कॉलेज मिळाले आहेत. मागील आठवड्यात ठाणे आणि मुंबईला मेट्रोसह ३० हजार कोटींची प्रोजेक्टचे उदघाटन केले. अनेक शहरात मेट्रोचा विस्तार होत आहे. ज्या गतीने विकास होत आहे, त्याच गतीने काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला. हरियाणाच्या निकालातून देशाचा काय मूड आहे तो समोर आला. तिसऱ्यांदा सत्तेत येणे ऐतिहासिक आहे. अर्बन नक्षलबद्दल लोकामध्ये खोटे पसरवले, पण त्यांनी काँग्रेस आरक्षण हिसकावून मताचे ध्रुवीकरण होत असल्याचे लक्षात आले. हरियाणात भाजपचा विजय झाला. आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने बुधवारी महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींहून अधिक विविध प्रकल्पांच्या कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमीपूजन, नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन यांचा यात समावेश आहे.
काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवले. हरियाणा भाजपच्या योजनांमुळे खूश आहे. काँग्रेसकडे समाजाला भ्रमित करण्याचे फॉर्म्युला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात विविध क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुस्लिम समाजालाही भीती दाखवा, हा काँग्रेसचा फॉर्म्युला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
महाराष्ट्राला मिळाली १० वैद्यकीय महाविद्यालयांची भेट
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या आणि शिर्डी विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारती प्रकल्पाचेही भूमीपूजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मेट्रोचा आणि विमानतळांचा विस्तार केला जात आहे. हिंदूच्या एका जातीला दुसऱ्या जातीसोबत भांडण लावा आहे, काँग्रेसची नीती आहे. काँग्रेस स्वत:चे वोट बँक पक्के करण्यासाठी जातीयवाद करत आहे. काँग्रेस सर्वजण हिताय सुखाय या संपवण्याचे काम करत आहे, काँग्रेस सत्तेत येण्यासाठी काही करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचाय?
काँग्रेस द्वेषाची सर्वात मोठी फॅक्टरी बनत आहे. हे गांधीजींना स्वातंत्रतानंतर समजून घेतलं होतं. म्हणून महात्मा गांधींनी काँग्रेस विलीन करा असे म्हटलं होतं. काँग्रेस संपली नाही, मात्र देशाला संपवत आहे. महाराष्ट्र लोक हे ऐकणार नाही. मेडिकल जागा वाढणार आहे. मेडीकल शिक्षेला सुलभ बनवण्याचे काम केले. यामुळे महाराष्ट्रामधील गरीब मुलांसाठी नवीन दरवाजे उघडले. महाराष्ट्रमधील युवा मराठीतून शिकून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करतील, असा आशावाद पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात एकाचवेळी १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु
केंद्र सरकारने नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांत ९०० नी वाढ होत आहे. ३५ महाविद्यालयात प्रतिवर्ष ४,८५० एमबीबीएस जागा उपलब्ध होत आहेत. मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. एकाचवेळी १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणे ही गौरवास्पद बाब असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर – विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे ७ हजार कोटी रुपये आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.