Friday, August 29, 2025

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे चित्रपटसृष्टीत पदार्पण!

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे चित्रपटसृष्टीत पदार्पण!

लवकरच प्रदर्शित होणार ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपट

मुंबई : आत्ताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेन्टसह भन्नाट कल्पना आहेत. त्यामुळेच अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करण्याच्या जोरात आहेत. अशातच 'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विशेषत: या चित्रपटासाठी ‘२० व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे.

जयदीपचा 'ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये जयदीप सोबत प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. इचलकरंजी तसेच तिथल्या डीकेटीई सोसायटीच्या टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी संस्थेत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर ,सांगली आणि गणेशवाडीचे विशेष सहकार्य या लाभले आहेत. तसेच ८ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगतपाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत.पायोस मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर निर्मित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे.साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचेआहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाशजाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंगमिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा