शशिकांत रा सावंत
शब्दांना सत्याची धार हे ब्रीदवाक्य असलेले दैनिक ‘प्रहार’ वृत्तपत्र म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारे, रोखठोक, परखड विचार देणारे वृत्तपत्र आहे. डॉ. सुकृत खांडेकर यांचे विचार देणारे वृत्तपत्र आहे. डॉ. सुकृत खांडेकर यांचे इंडिया कॉलिंग, स्टेटलाईन अभ्यासपूर्ण व वाचनीय आहेत. कवयित्री पूजा काळे यांचे मोरपीस ललित लेखनाचा उत्कृष्ट नमुना आहे.
साहित्यिक डॉ. विजया वाड, प्रा. प्रतिभा सराफ, स्वाती पेशवे, डॉ. वीणा सावेकर, अर्चना सोडें, लता गुठे, पूर्णिमा शिंदे, बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या कविता, काव्यकोडी, कवयत्री मेघना साने यांचा फिरता फिरता महाराष्ट्र सदर सुंदर आहे. सतीश पाटणकर यांचा कोकणी बाणा सदर महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धा व संस्कृती अध्यात्म सदरात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे रामनामाचे माहात्म्य अधोरेखित करतात. ऋतुराज सदरात ऋतुजा केळकर यांचा अर्थपूर्ण लेख. जीवन संगीत सदरात सद्गुरू वामनराव पै यांचे जीवन विद्याविषयी शिक्षण, प्रबोधन करणारे लेख. प्रा. मनीषा रावराणे ज्ञानेश्वरीवर विचार मंथन करणारा लेख अर्थपूर्ण व वाचनीय आहे. समर्थकृपा सदरात विलास खानोलकर यांचा स्वामी समर्थावर लेख व काव्य अभ्यासपूर्ण असून मनाला भावतो. रविवारच्या कोलाज पुरवणीत साहित्याची व काव्याची मैफल रंगत असते. पुनच्च दैनिक प्रहारला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
(कवी, पत्रकार, समाजसेवक , कार्याध्यक्ष, नवचैतन्य सामाजिक विकास संस्था)
रम्य आठवणींचे ‘सदर’ चालू ठेवणारा ‘प्रहार’ – अक्षरश्री विलास देवळेकर
दै.प्रहार वृत्तपत्राच्या १६व्या वर्धापन
दिनानिमित्त !! नेहमीच शब्दांना सत्याची धार देणारे लोकप्रिय दैनिक प्रहार वृत्तपत्र म्हणजे…
दैनंदिन बातमी ‘प्रसिद्ध’ करणारे
नित्यनेमाने सर्व कलाकारांना ‘प्रोत्साहन’ देणारे
कर्तव्य समजून ‘वृत्तसेवा’ देणारे
असे हे लोकप्रिय वृत्तपत्र !! १ !!
तर प्रहार म्हणजे प्रत्येक घटनेला ‘महत्त्व’ देणारे
हालचालींना सदा ‘वाचा’ फोडणारे
रम्य आठवणींचे ‘सदर’ चालू ठेवणारे
असे हे लोकप्रिय वृत्तपत्र !! २ !!
महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक प्रहार वृत्तपत्रास “१६व्या वर्धापन दिनानिमित्त” हार्दिक हार्दिक ‘वाचनीय’ शुभेच्छाऽऽऽ! आणि दैनिक प्रहार वृत्तपत्राचे “रौप्य महोत्सव” शानदार सोहळा साजरा होवो, ही मनापासून सदिच्छाऽऽऽ !! तसेच, दैनिक प्रहार वृत्तपत्राचे “पत्रकार-साहित्यिक व कवी आणि वाचक तसेच, जाहिरातदारांचे” ही मनःपूर्वक अभिनंदनऽऽऽ!!!
प्रहार वाढदिवस मानपत्र… – कवि : विलास खानोलकर
आज प्रहारचा वाढदिवस. आज खरा सुवर्ण दिवस ।। १।।
प्रहार श्रीकृष्णाचा भाऊ मावस पांडवांना दाखविला सुवर्ण दिवस ।। २।।
जनतेला मार्गदर्शन रात्र, दिवस गरिबांना दिशादर्शन शेकडो दिवस ।।३।।
आनंदी सोमवार ते आनंदी रविवार रोज वाचतो आनंदी प्रहार ।। ४।।
प्रहारने कधी खाल्ली नाही हार, केला शत्रूवर जबरदस्त प्रहार ।। ५।।
अनेक उत्सवमूर्तींना घातला हार, सर्वांशी केला सचोटीने व्यवहार ।। ६ ।।
मालक प्रहारचे खासदार राणे, दिनरात समाजसेवेचे गाती गाणे ।। ७।।
संस्थापक त्यांचे नारायण राणे पुत्र लढवय्ये नितेश अन् निलेश राणे ।। ८ ।।
खानोलकरांचे वाचती स्वामी समर्थ, कधी वाचती साहित्य संस्कृती समर्थ ।।९।।
कधी वाचती लेडी बॉस साऱ्या पेपरात प्रहारच खरा बॉस ।।१०।।
संपादकीय आवडते साऱ्यांना, स्ट्रेटलाईन आवडे सगळ्यांना ।। ११।।
क्रिकेटचे आवडे स्ट्रेट ड्राईव्ह सारा प्रहार पेपर वाटतो लाईव्ह ।। १२।।
जनतेचा आवाज प्रहार लोकपत्रे, प्रहार वाचताना आठवतात अत्रे ।। १३।।
संपादकीय वाचताना आठवती लो. टिळक, प्रहारच्या बातम्या एकदम ठळक ।। १४।।
प्रहारने कधी खाल्ली नाही हार, जनतेचे मुखपत्र केला शत्रूवर वार ।। १५।।
सोमवार ते शनिवार जनता बाचे प्रहार, प्रहार वाचताना रविवार आनंदीवार ।। १६।।
आज पूर्ण झाली वर्षे सोळा साजरा करण्यास आनंदी सोहळा ।। १७।।
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शहा वाचती प्रहार मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, पवार वाचती प्रहार ।।१८।।
गल्ली ते दिल्ली वाचती प्रहार गिरगांव ते गुरगांव वाचती प्रहार ।। १९।।
अमर विलास इच्छिती वर्षे एकशे सोळा जणू एक नंबर तेजस्वी सूर्याचा गोळा ।। २० ।।
दैनिक ‘प्रहार’च्या कार्याबद्दल अभिनंदन – डॉ. वीणा खाडिलकर
विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |
आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||
याचा अर्थ शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या ज्ञान दोन्ही विद्या कीर्ति मिळवून देणाऱ्या आहेत परंतु पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते. या सुभाषितावरून असे म्हणावेसे वाटते की वृत्तपत्र लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समाजामध्ये जागृती निर्माण करण्यापासून ते अनेक गोष्टी वृत्तपत्राच्या माध्यमातून साध्य करता येत आहेत आणि अशा या आज प्रसिद्ध अशा ‘दै.प्रहार’च्या वर्धापन दिनानिमित्त या वृत्तपत्राच्या विशेष कार्याबद्दल अभिनंदन करून मी हा एक छोटासा सुभाषित रूपी शुभेच्छा आपणास व्यक्त करीत आहे.
जनसामान्यांच्या मनात विशेष स्थान मिळवलेले वृत्तपत्र – राजश्री बोहरा
१६ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. “१६ वरीस धोक्याचं असं म्हणण्यापेक्षा १६ वरीस मोक्याचं” असं म्हणत हे शुभेच्छा पुष्प अर्पित आहे.
दैनिक प्रहार, जनसामान्यांच्या मनात स्वतःचे विशेष स्थान मिळवलेले वृत्तपत्र. जिथे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक घडामोडी सत्यवत समाजासमोर मांडल्या जातात. उत्कृष्ट संपादकीय सदरातून राजकीय परिस्थितीचे विमोचन केले जाते. विविध नियत सदरातून महाराष्ट्रातील असीम प्रतिभा असणाऱ्या विचारवंतांचे विचार निर्भीडपणे व्यक्त होतात. मराठी साहित्यिकांच्या लेखणीला जिथे नेहमीच विशेष स्थान देऊन नव कवींना प्रेरणा दिली जाते. लहान – थोर, गरीब – श्रीमंत अशा भेदभावात अडकण्यापेक्षा जनजागृती करून सक्षम समाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आणि उपक्रमशील आहेत. मराठीची अस्मिता जपत योग्य दिशादर्शक म्हणून अनेक वर्षे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या लोकप्रिय वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मी काळजापासून शुभेच्छा देत आहे. येणाऱ्या काळात लोकप्रियतेच्या उच्चतम शिखरापर्यंत पोहोचण्याचा बहुमान दैनिक प्रहार वृत्तपत्रात लाभो व त्याचे साक्षीदार आम्हाला होता येवो हीच शुभेच्छा!
लेखिका / कवयित्री, अध्यक्षा मुंबई प्रदेश अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद