पुणे : गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे अशोक माळी (Garba Artist Ashok Mali) हे चाकण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्साहाने गरबा खेळत होते. मात्र, अचानकपणे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे ते गरबा खेळता-खेळता जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर लगेचच त्यांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अशोक माळी यांच्या मृत्यूची घटना कॅमे-यात कैद झाली असून, या दुर्दैवी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. हा हृदयद्रावक प्रसंग उपस्थित असलेल्या अनेक चाहत्यांच्या डोळ्यांसमोर घडला, ज्यामुळे अनेकांच्या मनाला चटका लागला आहे. अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत अशोक माळींच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे.
Shocking Loss for Pune’s Garba Community 💔
Actor Ashok Mali, affectionately known as the Garba King of Pune, tragically passed away during a Garba event in Chakan. While dancing to his beloved Garba, Ashok Mali suddenly collapsed due to a severe heart attack. This heartbreaking… pic.twitter.com/OoLANdEWCJ
— Punekar News (@punekarnews) October 7, 2024
अशोक माळी हे पुणे आणि महाराष्ट्रातील गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे पुण्यातील कलाविश्वात शोककळा पसरली आहे. माळी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निघून जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दरम्यान, अशोक माळी यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणा-या अचानक मृत्यूच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि नियमित तपासणी करण्याचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित होते.