Sunday, April 20, 2025
Homeदहावी मार्गदर्शनSinger Accident Video : शुटींगदरम्यान अख्खा सेट गायिकेच्या अंगावर कोसळला, नेमकं काय...

Singer Accident Video : शुटींगदरम्यान अख्खा सेट गायिकेच्या अंगावर कोसळला, नेमकं काय घडलं ? पाहा VIDEO

शूटिंग दरम्यान कलाकारांचा अपघात झाल्याच्या घटना आपण अनेक वेळा ऐकतो. काही अपघात छोटे असतात, तर काही जीवघेणे ठरू शकतात. अशाच एका अपघाताची बातमी आता समोर आली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिकेचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे.

आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावणारी गायिका तुलसी कुमार (Tulsi Kumar ) हीचा शूटिंग दरम्यान अपघात (Accident ) झाला आहे. तुलसी कुमार तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओचं शूट करत होती. त्यावेळी एका सीनच्या दरम्यान तिला दुखापत झाली आहे. कॅमेऱ्याच्या समोर शूट करताना मागून संपूर्ण सेटच तिच्या अंगावर पडला आहे. सध्या तुलसी कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सेट अंगावर पडल्यामुळे तिला जोरात धक्का कंबरेला लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 तुम्हाला पाहायला मिळेल, या व्हिडीओमध्ये तुलसी कुमार कॅमेऱ्यासमोर उभी आहे आणि तितक्यात तिच्या मागचा सेट तिच्यावर कोसळतो. त्यामुळे तिच्या हाताला, पायाला आणि पाठीला इजा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुलसी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तुलसीच मागे सुद्धा लक्ष असत परंतु ती पुढे बघताच मागून सेट येऊन कोसळतो. तिथे असलेले क्रू मेंबर्स तिची काळजी घेताना दिसत आहेत. तुलसीचे चाहते या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत आणि तिच्यासाठी चिंता व्यक्त करत आहेत. तुलसी कुमारने आपल्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. तिने बॉलीवूडमधली अनेक हिट गाणी दिली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -