Wednesday, April 30, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

ओव्हरहेड वायर तुटली, लोकल वाहतूक कोलमडली

ओव्हरहेड वायर तुटली, लोकल वाहतूक कोलमडली

मुंबई : दिवा आणि कोपरदरम्यान रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल रखडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. लोकलची वाहतूक कोलमडल्याने कामावर जाणा-या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचं कामी हाती घेण्यात आलं आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. सकाळची वेळ असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment