Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : ...तर संजय राऊतला हाजमोलाच्या गोळ्या घ्याव्या लागतील!

Nitesh Rane : …तर संजय राऊतला हाजमोलाच्या गोळ्या घ्याव्या लागतील!

आमदार नितेश राणे यांची संजय राऊतवर बोचरी टीका

मुंबई : आज सकाळपासून हरियाणा (Haryana) आणि जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir Assembly Election) निकाल यायला लागले आहेत. पुन्हा एकदा हरियाणामध्ये भाजपा (BJP) पक्षाचं विचाराचं सरकार हरियाणामध्ये येतंय. एक हिंदुत्ववादी विचारांच्या मुख्यमंत्र्यांना हरियाणाच्या जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या बाजुने कौल दिला आहे. ज्या पद्धतीचे निकाल येत आहेत त्यावर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाच्या विचारावर हरियाणातील जनतेने विश्वास ठेवला आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्येही भाजपा हा एकटा पक्ष निवडणूक लढवत आहे. त्याठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हा डबल डिजीटमध्येही गेलेला नाही. म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणारा अजेंडा भाजपाचं केंद्र सरकार चालवत आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरची जनता हे देखील स्वीकारेल असा ठाम विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीवर केलेल्या विधानावरही नितेश राणे यांनी चांगलेच फटकारले आहे.

हरियाणा सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है!

संजय राजाराम राऊत सकाळी ९० नावाचं टॉनिक घेऊन वक्तव्य करतो. भाजपा हरियाणा हरणार जम्मू काश्मीरमधूनही भाजपाचा सुपडा साफ होणार, अशी . संजय राजाराम राऊतने कितीही ओरड घातली तरी हरियाणाचं निकाल लागल्यानंतर याला हाजमोलाच्या गोळ्या घ्याव्या लागतील, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. हरियाणा सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है! अशी घोषणाही नितेश राणे यांनी दिली. काही महिन्यांनी महाराष्ट्राचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्येही महायुतीचं सरकार मोठ्या विजयाने निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या निकालानंतर संजय राऊत दिसेनासा होणार

महाराष्ट्राच्या निकालानंतर संजय राजराम राऊत कोठेही दिसणार नाही, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा फोटो लावून सर्वांना संजय राजाराम राऊतला शोधावं लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -