मुंबई : सध्याच्या काळात लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्व नागरिकांना सोशल मीडियाचे (Social Media) प्रचंड वेड लागले आहे. अशातच इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे. लाखो वापरकर्ते यावर फोटो आणि व्हिडीओ तसेच रील्स शेअर करतात. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास इन्स्टाग्राम सर्व्हिस बंद (Instagram Down) झाली होती. त्यामुळे या कालावधीत अॅप वापरणे अवघड जात होते.
इन्स्टाग्रामची सेवा ठप्प होताच अवघ्या काही मिनिटांत वापरकर्त्यांनी लाखो तक्रारी व्यक्त केल्या. वापरकर्त्यांना इंस्टाग्राम उघडताना “सॉरी, समथिंग वेंट राँग” असे लिहिलेले दिसत होते. तसेच, ते यावर काम करत असून काही कालावधीत समस्या दूर करतील, अशी माहिती त्या अधिसूचनेत देण्यात आली होती.
दरम्यान, अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर इन्स्टाग्राम समस्या दूर झाली. परंतु वापरकर्ते अर्धा तासही इन्स्टाग्रामशिवाय राहू न शकल्यामुळे सध्याच्या पिढीला सोशल मीडियाचे व्यसन लागल्याचे चित्र दिसून येते.