
१०वी उत्तीर्णही करु शकतात अर्ज
मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र काहींचे उच्च शिक्षण पूर्ण नसल्याने त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच तरुणांसाठी आनंधाची बातमी समोर आली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ONGC) मेगाभरती जारी केली आहे. तब्बल २२३६ रिक्त पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओनजीसीमध्ये अप्रेंटिस पदासाठी (Apprentice Recruitment) ही भरती केली जाणार असून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत इच्छुक उमेदवारांना NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावा लागणार आहे. तसेच २५ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी १०वी/१२वी / ITI/ डिप्लोमा / बीएससी / बीई / बीटेक / बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
निवड प्रक्रिया
या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती देण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करुन निवड केली जाणार आहे.
वेत
अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.