Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीकाँग्रेसचे आरोप तथ्यहिन, बेजबाबदार - निवडणूक आयोग

काँग्रेसचे आरोप तथ्यहिन, बेजबाबदार – निवडणूक आयोग

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. परंतु, नंतर काही तासात भाजपने आघाडी घेत तब्बल ४८ जागा पटकावल्या. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाची वेबसाईट संथ असून निकाल अपडेट करण्यास उशिर करीत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आरोप तथ्यहिन आणि बेजबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

हरियाणा मतमोजणीचे चित्र पालटल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकालाचे अपडेट करण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्या या आरोपांना मिनिट-टू-मिनिट डेटा अपडेटसह प्रत्युत्तर दिले. ईसीआयने म्हटले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार होते त्या दिवशी ४ जून रोजी देखील काँग्रेसने असेच आरोप केले होते. आयोगाला हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे आढळून आले आणि निवडणूक आचार नियमांच्या नियम ६० अन्वये पूर्वनिर्धारित मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होते, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी मतमोजणीवर सतत लक्ष ठेवतात.निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हरियाणा निवडणूक निकालाचा डेटा अपडेट करण्यात विलंब केल्याच्या आरोपावरून आयोगाने सांगितले की, कायदेशीर तरतुदींनुसार, प्रत्येक जागेवर पडलेल्या मतांची मोजणी तेथे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि पक्षांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाते. डेटा अपडेट करण्यात उशीर झाल्याच्या निराधार आरोपांबाबत आम्हाला कोणताही पुरावा सापडलेला नाही.

जयराम रमेश यांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल प्रत्येक ५ मिनिटांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपडेट केले जात होते. मतमोजणीच्या सुमारे २५ फेऱ्या झाल्या आणि मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर पाच मिनिटांत डेटा वेबसाइटवर अपलोड झाला. जयराम रमेश यांचे आरोप बेजबाबदार, तथ्यहीन असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने फेटाळून लावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -