Monday, June 30, 2025

हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी आज मतमोजणी

हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी आज मतमोजणी

हरियाणा/जम्मू : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहे. या निकालासाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे.


हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.


हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्यानंतर आता ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता हरियाणातील नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.


८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर जवळपास दुपारपर्यंत जम्मू- काश्मीर आणि हरियाणात कोणते सरकार येईल? याचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाचे अपडेट तुम्हाला तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in अधिकृत संकेतस्थळावरही निकालाचे अपडेट मिळतील. या बरोबरच व्होटर हेल्पलाइन ॲपवरही तुम्हाला अपडेट मिळू शकतील.

Comments
Add Comment