Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीBullet Train : बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर! मुंबई ते अहमदाबाद प्रवास होणार...

Bullet Train : बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर! मुंबई ते अहमदाबाद प्रवास होणार अवघ्या दोन तासात

‘असे’ सुरु आहे महाराष्ट्रातील सागरी बोगद्याचे काम

मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या बुलेट ट्रेनबाबत (Bullet Train) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागरिकांचा प्रवास सुकर आणि सोयीस्कर होण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकल्प सुरु केले जात आहेत. मेट्रोनंतर लवकरच बुलेट ट्रेनदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु होणार आहे. या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून सध्या यासाठी ठाण्याच्या खाडीत खोदकाम सुरु झाले आहे. हे कामपूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद (Mumbai To Ahmedabad) प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे.

काय आहेत प्रकल्पाची वैशिष्टये?

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अरबी समुद्रा खालून जाणारा तब्बल २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली २५ ते ६५ मीटर इतकी असेल. असून बोगद्याचे खोदकाम तीन मोठ्या मशीनच्या मदतीने करण्यात येणार आहे. या बोगद्यातून ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. सध्या ठाण्याच्या खाडीत ७ किमी बोगदा खोदला जात असून यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर केला जात आहे.

त्याचबरोबर मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी सेकेंट पायलिंगचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित खोदकाम सुरू आहे. विक्रोळी, घणसोलीजवळील सावली येथे या वर्षाच्या अखेरीस येथे पहिले टनेल बोअरिंग मशीन खाली जमिनीत टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर शिळफाटा येथे आतापर्यंत २०० मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर १२ स्टेशन असणार आहेत. यातील ४ स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत. तर इतर ८ स्थानके गुजरातमध्ये असणार आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (BKC), ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.

दरम्यान, ऑगस्ट २०२६ पासून बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होण्याचा अंदा वर्तवण्यात येत असून यासाठी तब्बल ३६८१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -