Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीHaryana Election : हरियाणात भाजपाची बहुमताच्या दिशेने वाटचाल!

Haryana Election : हरियाणात भाजपाची बहुमताच्या दिशेने वाटचाल!

चंदीगड : हरियाणा विधानसभेच्या (Haryana Assembly Election) ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज, मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. यात सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला राज्यात ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसला ५१ जागांवर आघाडी मिळाली होती. तर भाजपची २७ जागांवर सरशी होताना दिसून आली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात दिसून आले. काँग्रेसकडून जल्लोषही साजरा व्हायला लागला होता. परंतु, मतमोजणी पुढे जाऊ लागल्या चित्र पालटू लागले. सकाळी १० वाजेपासून आकडेवारी त फरक पडू लागले. त्यानंतर ११ वाजता भाजपची ४९ जागांवर सरशी झाली. तर काँग्रेस ३५ जागांवर पुढे होती. तर आयएनएलडी २ आणि इतर ४ जागांवर पुढे आहेत. हरियाणा विधानसभेत बहुमतासाठी ४८ जागांची आवश्यकता असून राज्यात भाजपला बहुमत मिळल्याचे चित्र आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -