Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीBigg Boss Marathi Suraj Chavan : सूरजने ‘ते’ शब्द खरे करून दाखवले!...

Bigg Boss Marathi Suraj Chavan : सूरजने ‘ते’ शब्द खरे करून दाखवले! Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन आधी गेला जेजुरीला, नंतर बारामतीत जंगी स्वागत, व्हिडिओ पाहा

गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘झापूक झुपक’, म्हणजेच सूरज चव्हाण हे नाव चांगलचं गाजलंय. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतल्यावर हा ‘गुलीगत किंग’ एवढी मोठी बाजी मारेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र, पहिल्या आठवड्यापासूनच त्याचा चाहतावर्ग त्याला भक्कम पाठिंबा देत होता. इतकचं नव्हे तर, ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केल्यापासून त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वोटिंग आणि भरभरून साथ देऊन सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. अखेर या सगळ्याची पोचपावती ७० दिवसांनी ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीच्या रुपात सूरजला मिळाली.

सुरुवातीला ‘बिग बॉस’मध्ये ( Bigg Boss Marathi ) अभिजीत सावंतशी संवाद साधताना सूरजने “यंदाची ट्रॉफी मीच जिंकणार” असं वक्तव्य केलं होतं. ट्रॉफी जिंकलो की, “ट्रॉफी हातात घेऊन सर्वात आधी मी खंडोबाला माझ्या पप्पांकडे जाणार… त्यानंतर, मी आई मरीमातेकडे जाणार इच्छा पूर्ण होऊ द्या पप्पा… ओम नम:शिवाय” असं सूरजने अभिजीतला सांगितलं होतं आणि अगदी खरंच महाराष्ट्राला आज हे शब्द त्याने खरे करून दाखवले आहेत.

ट्रॉफी घेऊन सूरज पोहोचला जेजुरीला

मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन सूरज चव्हाण त्याच्या गावी रवाना झाला. पण, आधीच सांगितल्याप्रमाणे सूरजने सर्वात आधी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. जेजुरीच्या गडावर जाऊन त्याने आशीर्वाद घेतले. यानंतर बारामतीच्या मोढवे गावी त्याच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. जेजुरी, मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेऊन सूरज आता मोढवे गावी पोहोचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by datta koli (@datta_261295_official)

 सूरजचं त्याच्या गावी स्वागत होत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या गावात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. झापुक झुपूक करणाऱ्या सूरजला बऱ्याच दिवसांनी गावी परतताना पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले होते. सूरजबरोबर फोटो काढण्यासाठी संपूर्ण गावात गर्दी झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhijit Dixit (@abhi_dixit_4483_)

गावी पोहोचल्यावर सूरजचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्याने सर्वांची भेट घेऊन गेले ७० दिवस सपोर्ट केल्याबद्दल खूप आभार मानल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. सध्या संपूर्ण कलाविश्वातून ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांसह सूरज चव्हाणवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -