Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Suraj Chavan : सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव 'झापूक झूपुक'

Suraj Chavan : सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव 'झापूक झूपुक'

मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची घोषणा!


मुंबई : ग्रामीण भागात 'टिकटॉक' पासून लोकांच्या मनोरंजनाला सुरुवात करणा-या सूरज चव्हाणने (Suraj Chavan) 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी पटकावली आहे. सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी पटकावताच त्याच्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील टॉपच्या दिग्दर्शकाने मोठी घोषणा केली आहे. सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार असल्याची घोषणा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली आहे. या सिनेमाचं नाव अजून दिग्दर्शकाने घोषित केलेलं नाही. दरम्यान दिग्दर्शकाच्या नव्या ऑफरमुळे सूरज चव्हाण आणखी एका सिनेमात काम करता येणार आहे.



सूरज चव्हाणचा 'राजा राणी' हा दुसरा सिनेमा असणार


सूरज चव्हाणचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. सूरजच्या पहिला सिनेमाचा टिझर यापूर्वी लाँच झाला आहे. 'राजा राणी', असं सूरजच्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे. येत्या 18 ऑक्टोबरपासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजचा पहिला सिनेमा प्रेमाच्या स्टोरीवर असणार आहे. ‘राजाराणी’ चित्रपटाची निर्मिती 'सोनाई फिल्म क्रिएशन'कडून करण्यात येणार आहे. तर सिनेमाची कथा, संवाद लेखन गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे.


सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' या सिनेमात भारत गणेश पुरे, सुरेश विश्वकर्मा माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. 'राजा राणी' या सिनेमाचे दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी पार पाडली आहे. 'राजा राणी'चे संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी केले आहे. सूरजचा 'राजा राणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय आता केदार शिंदे सूरजला घेऊन त्याचा दुसरा सिनेमा काढणार आहेत. त्यामुळे सूरजचा दुसरा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment