नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक (Nagpur Crime News) घटना समोर आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७वर दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक या घटनेनं हादरलं आहे.
एका मनोरुग्ण व्यक्तीने नागपूर रेल्वे स्थानकावर डोक्यावर वार करुन हत्या केली. आरोपी सदर घटनेनंतर पळून गेला होता. मात्र, रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडले. जयराम राम अवतार केवट (वय-३५) असं आरोपीचं नाव आहे. सदर आरोपी रेल्वे स्थानकावर लोकांना मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफ्टरने वार करत त्याने दोन जणांची हत्या सुद्धा केली. तर दोघंजण गंभीर जखमी झाले आहेत. गणेश कुमार डी-54 ( दिंडीगुल तामिळनाडू) हे एक मृत प्रवासी नाव आहेत. तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही आहे.
नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भयानक प्रकार
राज्यातील उपराजधानीत रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागचं कारण म्हणजे नागपुरामधील (Crime News) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या मेडिकलमध्येच चक्क बनावट औषधीचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनामध्ये या संपूर्ण प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. त्याचप्रमाणे या बनावट औषधीचे सेवन करणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीत चार कंपन्यांचे साटेलोटे असल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या चारंही कंपन्यांचे मालक आणि संचालकांविरोधात अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.