कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथे बांबू हस्तकला संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितले की, देशातील हा पहिला प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असून याचा फायदा या ठिकाणच्या महिलांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मंजूर झालेल्या बांबू संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी बांबू संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, भाजपचे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, मोहन सावंत, संजय भोगटे, ॲड अमोल सामंत, शेखर सामंत, रोहित भोगटे, नायब तहसीलदार गोसावी, प्रतीक आढाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, कुडाळ उपअभियंता धीरज पिसाळ, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण मंत्री व सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी सांगितले की, ही इमारत बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे या इमारतीमध्ये बांबू संदर्भातील प्रशिक्षणे तसेच बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू असणार आहेत बांबू यापासून नवीन आर्थिक क्रांती घडू शकते हा रोजगार प्रत्येक घरामध्ये निर्माण होऊ शकतो त्यामुळे महिला सक्षम होऊ शकतात भारतातील पहिला हा प्रकल्प सिंधुदुर्गात होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…