Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीVishwanath Bhoir : कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी आणखी ५० कोटींचा निधी!

Vishwanath Bhoir : कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी आणखी ५० कोटींचा निधी!

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश 

सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांचे भूमिपूजन 

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झाला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात आणि त्यानंतरचे काही महिने म्हणजे नागरिकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था असते. आधी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला तसेच पाठदुखीच्या व्याधीला सामोरे जावे लागते. नागरिकांचा हा त्रास विचारात घेऊनच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी निधीची वेळोवेळी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी दिली.

नागरिकांनी मानले आमदार भोईरांचे आभार

पहिल्या टप्प्यामध्ये भगवा तलाव येथील आदेश्वर चौक ते विकास हाईटस् (४.९५ कोटी), सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता (४.९० कोटी) आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता (४.५० कोटी) अशा १४ कोटी ३५ लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसांत भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली. येत्या काळात आपल्या भागांत चांगला रस्ता मिळणार असल्याबद्दल या भागांतील नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासुन आभार मानले आहेत.

भूमीपूजन सोहळ्याला उपस्थितांची मांदियाळी

यावेळी झालेल्या भूमीपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, शहर अधिकारी सुजित रोकडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -