Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीVegetables Price Hike : व्हेज थाली महागली! खवय्यांना द्यावे लागतात अधिकचे पैसे

Vegetables Price Hike : व्हेज थाली महागली! खवय्यांना द्यावे लागतात अधिकचे पैसे

मुंबई : सध्या कांदे, बटाटे, टोमॅटोचे (Vegetables Price Hike) भाव वाढले आहेत. याचा फटका शाकाहारावर झाला असून हॉटल्समधल्या शाकाहारी थाळ्यांमध्ये वाढ झाली आहे. सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते, मात्र सप्टेंबर महिन्यात याचे चित्र उलटे दिसून आले. कांदे, बटाटे व टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती बनवलेल्या चिकनपेक्षा अधिक, शाकाहारी थाळीची (Veg Food Plate) सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली. ब्रॉयलर चिकनच्या किमतीतील घटीने यात हातभार लावला.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स’च्या अहवालाने शाकाहार महागण्यामागील कारणांचा वेध घेतला आहे. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये या जिनसांसह, टोमॅटोच्या किमती अनुक्रमे ५३ टक्के, ५० टक्के आणि १८ टक्क्यांनी वाढल्या. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वार्षिक तुलनेत नव्हे, तर आधीच्या महिन्याच्या तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत ठरली आहे.

शाकाहारी थाळीची किंमत सप्टेंबर २०२३ मधील २८.१ रुपयांवरून यंदाच्या सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढून ३१.३ रुपयांवर गेली आणि आधीच्या ऑगस्टमध्ये ती ३१.२ रुपये होती. थाळीच्या किमतीत ३७ टक्के वाटा असलेल्या भाज्यांच्या किमती वाढल्याने एकंदरीत शाकाहारी थाळी महागली आहे. बरोबरीने डाळींचे उत्पादन घटल्यामुळे त्यांच्या किमतीही वार्षिक तुलनेत १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कपातीमुळे इंधनाचे दर ११ टक्क्यांनी घसरले आहेत. मांसाहारी थाळीच्या बाबतीत, ५० टक्के योगदान असलेल्या ब्रॉयलरच्या किमतीत १३ टक्क्यांनी घट झाल्याने त्या थाळीची किंमत वर्षभरात २ टक्क्यांनी घसरून ५९.३ रुपये झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -