नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता, पैल माझे गाव रे
आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे,
भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनी गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे
नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजले मी,
चांदवाल्याला
माझा जिवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संग त्याच्या भाव रे
गीत – अशोक परांजपे
स्वर – सुमन कल्याणपूर
व्यसन
नको ते व्यसन,
नको तो त्रास.
तंबाखू, सिगारेट,
वर करा मात.
रोज पिऊन,
येतो तो दारू.
बायकोला लागतो,
रोज, रोज मारू,
दारूने होईल
संसार उद्ध्वस्त.
दारू सोडली तर
संसार होईल मस्त.
व्यसनाने होतो,
आरोग्याला त्रास.
पोटात होतो,
रोगांचा निवास.
चला, पथनाट्याने,
जनजागृती करू.
आनंदी कुटुंबाचा,
वसा स्वीकारू.