मॉनिटर : कविता आणि काव्यकोडी

बाबा, वर्गाचा मी आता
झालोय मॉनिटर
वर्गाची सर्व जबाबदारी
माझ्याच शिरावर


वर्गाची शिस्त आता
मलाच बघावी लागणार
गडबड करणाऱ्यांची नावं
मी फळ्यावर लिहिणार


अभ्यास करणार नाही त्याला
समजावून मी सांगणार
ऐकलं नाही तर सरांकडे
तक्रार त्याची करणार


वर्गाचीही स्वच्छता आता
मीच जातीने पाहणार
कचरा कोण करतंय याकडे
बारीक लक्ष ठेवणार


सर्वांच्याही आधी मी
लवकर शाळेत पोहोचणार
बाई-सर नसतील तर मी
वर्ग छान सांभाळणार


मॉनिटर म्हणून वर्गात
वाढेल माझी वट
मुलांच्या मदतीला मी
धावून जाईन झटपट


वर्गाच्या भल्यासाठी बाबा
जेव्हा मी पुढे असेन
मॉनिटरचा बिल्ला तेव्हाच
छातीवर शोभून दिसेल


बाबा म्हणाले, “शाब्बास...!
हुशार माझा श्याम
विश्वास आहे मला बाळा
तू नेकीने करशील काम...!”



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) अपूर्वाई, नसती उठाठेव
वाऱ्यावरची वरात
बटाट्याची चाळ यांची
दिसे घराघरात...


तुझे आहे तुजपाशी,
अंमलदार, ती फुलराणी,
खोगीरभरती, पूर्वरंग
हे सर्व लिहिले कुणी?


२) कोलंबिया यानातून ती
अवकाशात गेली
सोळा दिवस अंतराळात
राहून परतली


पहिली भारतीय महिला
ठरली अवकाशयात्री
कोण आकाशकन्या
जिची साऱ्या जगात महती?


३) हिंगण्याला मुलींसाठी
‘बालिकाश्रम’ काढला
‘भाऊबीज’ गोळा करून
कामाचा व्याप वाढविला


श्रमातून ‘महिला विद्यापीठ’
साकार त्यांनीच केले.
‘भारतरत्न’ किताबाने
कोणास गौरविले?


उत्तर -


१) महर्षी धोंडो केशव कर्वे
२) पु. ल. देशपांडे
३) कल्पना चावला

Comments
Add Comment

बाई माणूस म्हणून जगताना...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा

स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर आजची स्त्री म्हणजे केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून, ती शिक्षण,

हुशारी

कथा : रमेश तांबे शिक्षणाचा अधिकार या नियमाखाली शहरातल्या मोठमोठ्या इंटरनॅशनल शाळांमध्ये काही जागा गरीब

अंधारात रात्री कसे दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता त्यांच्या संध्याकाळचा शाळेचा अभ्यास पूर्ण करून मावशीजवळ येऊन बसल्यात.

बाग आणि बायका

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोसायटीच्या कोपऱ्यावर एक छोटीशी बाग आणि खूप सारी बाके होती. वृद्धांसाठी केलेली

हृदय परिवर्तन

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर हृदय परिवर्तन म्हणजे केवळ मत बदलणे नव्हे, तर विचार, भावना आणि वर्तन यांमधील