Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या मंचासमोर राज्यातील लाडक्या बहिणींची 'मायेची गोधडी'!

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या मंचासमोर राज्यातील लाडक्या बहिणींची ‘मायेची गोधडी’!

लाडक्या बहिणींनी विणलेली १०० फूट लांब, १००० स्केअरफूट रुंद गोधडी; ठरली ठाण्यातील मोदींच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण!

मुंबई : गोधडी पाहून आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती आणि जुन्या पिढीने आपल्याला दिलेला वसा लक्षात राहतो. गोधडीमध्ये आपल्याला माया मिळते. गोधडीतल्या उबेमुळे आपल्याला शांत झोपदेखील लागते, हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालंय. “लाडकी बहीण” योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व बहिणींना आपणही काही तरी करु ही उमेद निर्माण झाली. त्यानुसार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यानिमित्त विशेष गोधडी तयार केली. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील महिलांच्या प्रेमाचं प्रतिक म्हणजे ही गोधडी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ठेवण्यात आली होती.

गोधडीचं वैशिष्टयं

नगर, धुळे, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांहून महिला एकत्र आल्या. त्यांनी आपल्या साडीतील कापड एकत्र आणले आणि वेगवेगळ्या कापडातून ही गोधडी तयार झाली. १०० फूट लांब आणि १००० स्केअर रुंद अशी गोधडी बनवण्यात आली होती. ही गोधडी शिवण्यासाठी ७ तासांचा अवधी लागला. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ही गोधडी शिवण्यात आली. यानंतर ठाण्यातील कार्यक्रमात मुख्य मंचाच्या समोरच ही गोधडी ठेवण्यात आली होती.

या गोधडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धावते टाके रंगांना बांधून ठेवतायत. यातील प्रत्येक रंगाचे वेगळं अस्तित्व आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात नव्या भारताची ओळख पोहोचवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम विविध समाजपयोगी उपक्रमांना चालना देत आले आहेत. त्यामुळे यांच्या संकल्पनेतून ही गोधडी साकारण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनादेखील या गोधडीबद्दल आस्था वाटली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या गोधडीचं कौतुक केलंय. या मंडळींमुळे आज लाडक्या बहिणींना स्वत:च्या नोकरी, व्यवसायात योजनेच्या निधीचे सहकार्य मिळत आहे.

अशाप्रकारे प्रोत्साहन मिळाले तर पैशाअभावी बाहेर न आलेल्या कला पुढे येतील. हा संपूर्ण उपक्रम कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. ‘लाईट अॅण्ड शेड’चे यात मुख्य सहकार्य लाभले. दिग्दर्शक विजू माने यांनी यात विशेष सहकार्य केले.

चंद्रिका नवगण किशोर, अनया चंद्रिका, शारदा ईश्वर इशी, रत्नाबाई जगदाळे, अर्चना नेटके, माया रुक्मिणी एस., दिव्या नागर, प्रीती वाडकर, सोनल सकपाळ आणि स्नेहल पाटील या सर्व बहिणींसह वामन तुळसकर, सचिन यादव, विवेक यादव, सौरभ नाईक, शुभम राणे, बालचंद्र जंगणवार, संजय पाटील यांनी देखील या उपक्रमात महत्वाची कामगिरी बजावली. या उपक्रमावेळी सिने कलाकार ओंकार भोजने, विठ्ठल तळवलकर हे देखील उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -